लातूर भीषण अपघात : सात प्रवासी ठार तर १३ गंभीर
लातूर आणि नांदेड या राज्य महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रूझरचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना महामार्गावरील कोळपा पाटीजवळ घडली आहे. हा अपघात आज मंगळवारी पहाटे झाला असून सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झालेत. या महामार्गावरील 15 दिवसातील हा दुसरा भीषण अपघात आहे.या अपघातात टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रूझरचा विरुद्ध बाजूने येत असलेल्या दुसऱ्या क्रूझरवर जावून धडकली आहे.क्रूझर जीप (क्रमांक एम एच 24 व्ही 1104) ही लातूर रोड हून लातूर येथे येत होती.रेल्वे स्टेशनवर उतरलेले प्रवासी प्रवास करत होते.दुसरी क्रूझर जीप (क्रमांक एमएच 13 बीएन 2454 ) ही पंढरपूरहून नांदेडच्या दिशेनं प्रवास करत होती. एका चुकीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.जखमींमध्ये लातूर, नांदेड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश आहे.
मृत व्यक्तींची नावं खालील प्रमाणे :
-
विजय तुकाराम पांडे ( वय 30 वर्ष, दापूर , सिन्नर नाशिक)
-
दत्तू बळीराम शिंदे (वय 35 वर्ष, नांदेड)
-
शुभम शरद शिंदे (वय 25 वर्ष, अहमदनगर )
-
उमाकांत सोपान कारुले(वय 45 वर्ष)
-
मीना उमाकांत कारुले (वय 40 वर्ष, लातूर)
-
तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय 35वर्ष, लातूर)
-
मनोज चंद्रकांत शिंदे ( वय 25 वर्ष, लातूर)
जखमींची नावे
1) अर्जुन रामराव राठोड (वय २७, परतूर, जि. जालना)
2) शब्बीर बालेखॉं खान (वय १९, रा. निलंगा)
3) कृष्णा दौलत भवर (वय १९, रा. नाशिक)
4) मलिकार्जून गोविंद होडे (वय ३२, गातेगाव, ता. लातूर)
5) वैष्णवी धनंजय भालेराव (वय १८, दिपज्योतीनगर, लातूर)
6) मदन विठ्ठल पवार (वय २३, रा. औरंगाबाद)
7) शेख इम्रान इम्तेयाज (वय १९, रा. चाकूर)
8) गणेश उमाकांत कासले (वय १२, रा. रेणापूरनाका, लातूर)
9) विद्या धनंजय भालेराव (वय ४२, दिपज्योतीनगर, लातूर)
10) ज्ञानेश उमाकांत कासले (वय ११, रा. रेणापूरनाका, लातूर)
11) रामराव मारोती घुगरे (वय ४९, रा. नाशिक)
12) रविदास जयराम सानप (वय ३४, रा. नवी मुंबई)
13) अजय दयानंद वाघमारे (वय २४, लातूररोड, लातूर)