गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विधानपरिषद पोटनिवडणुक : भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. लाड सोमवारी सकाळी 11 वाजता आपला अर्ज भरतील. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी  रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील उपस्थित होते. याच बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला.