बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (15:38 IST)

संजय राऊत काय बोलता याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही : नाना पटोले

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या अपयाशाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत  बोलले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना पेपर देखील वाचत नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. 
 
“संजय राऊत काय बोलता याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचं होतं ते अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. त्यांचा सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलेलं आहे. त्यामुळे माध्यमांद्वारे आम्ही स्पष्ट सांगितलं आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं.” असं नाना पटोले यांनी  म्हटलं आहे.