जे काही व्हिडिओ विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल : पटोले
विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जे काही व्हिडिओ विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना चांगलेच माहित आहे. त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग करुन फोन टॅपींग प्रकरण केलं आहे. यंत्रणांचा दुरुपयोग करायची सवय भाजपची आहे. फडणविस सरकारपासून ही प्रथा पडली आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
भाजपनेच सत्तेचा दुरुपयोग केला आहे. फोन टॅपींग प्रकरण केलं गेले. रश्मी शुक्ला प्रकरणात काय झाले ते माहित आहे. त्यामुळे भाजपने कांगाव करणे थांबवावे. मात्र, इक्बाल मिरचीच्या आरोपावरुन भाजपवरही कारवाई का केली जाऊ नये? रश्मी शुक्ला प्रकरणात काय झाले ते माहित आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.
फडणवीस यांच्या पेनड्राईव्हवर उद्या गृहमंत्री याबाबत उत्तर देतील. मात्र, व्हिडिओची सत्यता तपासणे गरजेचे आहे. भाजपने इक्बाल मिरचीकडून गोळा केलेल्या फंडींगचंही उत्तर दिलं पाहिजे. शरद पवारांसारख्या महत्वाच्या व्यक्तीवर आरोप आहे. त्यामुळे, व्हिडिओची तपासणी झाली पाहिजे. व्हिडिओची डबींग झालेले असू शकते. महाराष्ट्रात टॅपींगची प्रथा भाजपने सुरु केली आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.
कुणाच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज कसे बाहेर आले. हे देखील तपासले पाहीजे. जर दाऊदसोबत व्यव्हार झाला असेल तर नवाब मलिक यांचा राजिनामा घेतलाच पाहिजे, याबाबत दुमत नाही. विघातक शक्तींसोबत जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र, इक्बाल मिरचीच्या आरोपावरुन भाजपवरही कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला