मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (20:01 IST)

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर स्वागतच करू : नारायण राणे

येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच करु, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. 
 
यापूर्वी या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी यायलाच पाहिजे असे नाही असे विधान नारायण राणे यांनी केले होते. पण आता मात्र राणे यांचा या बाबतीतला सूर बदलला असून मुख्यमंत्री या उद्घाटनाला आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करु, असे राणे यांनी म्हटले आहे.
 
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच कार्यक्रमांना आलंच पाहिजे असं काही नाही म्हटल्यावर वाद निर्माण झाला होता. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.