कोरोनामुळे दुस-या वर्षी बाप्पाचा प्रवास थांबला, पण रेल्वे यार्डात गणेशाची स्थापना
कोरोनामुळे रेल्वे बंद असली तरी चाकरमान्यांनी रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीत श्री गणेशाची स्थापना करुन २५ वर्षाची परंपरा अखंडीत ठेवली. मनमाड-ते-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये धावत्या गाडीत दरववर्षी रेल्वेने रोज प्रवास करणारे चाकरमाने रेल्वेच्या एका बोगीत गणपतीची स्थापना करतात.पण,ही रेल्वे बंदअसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शुक्रवारी ही स्थापना करण्यात आली.
![](https://wd-image.webdunia.com/image-conversion/process-aws.php?url=https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-09/10/full/1631269142-4635.jpg&w=&h=&outtype=webp)
मनमाड ते कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये दरवर्षी नाशिक पर्यंत अप-डाऊन करणारे चाकरमान्यांकडून पासधारकांच्या बोगीतदरवर्षी गणेशाची स्थापना करीत असतात,बोगीत एक दिवस अगोदरच आकर्षक सजावट करण्यात येत असते.यात विविध सामाजिक संदेशाचे पोस्टर सुध्दा लावण्यात येत असतात.
![](https://wd-image.webdunia.com/image-conversion/process-aws.php?url=https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-09/10/full/1631269275-277.jpg&w=&h=&outtype=webp)
मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच सावट आणि अजून ही स्थानिक पातळीवरुन सुटणा-या रेल्वे ट्रेन बंद असल्याने गोदावरी एक्सप्रेस अनेक महिन्यांपासून रेल्वे यार्डातच उभी आहे,मात्र परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यार्डात उभ्या असलेल्या गाडीच्या बोगीतच सजावट करण्यात येऊन सोशल डिस्टन्सच पालन करीत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.दररोज येथे पुजा-आरती करण्यात येणार आहे.गाडी बंद असल्याने नाशिकला जाणा-या चाकरमान्यांच हाल होत असल्याने गोदावरी एक्सप्रेस लवकर सुरु करा अशीच मागणी यावेळी करण्यात आलीय..