शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:21 IST)

काय म्हणता, महाबळेश्वरमध्ये काश्मीरचं केशर पिकणार

महाबळेश्वरमध्ये आता काश्मीरचं केशर पिकणार आहे. यामुळे महाबळेश्वरला नवी ओळख मिळाली आहे. कृषी विभागातर्फे महाबळेश्वरमध्ये केशर लागवडीचा पहिला प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. मेटगुताड आणि क्षेत्र महाबळेश्वर या भागात केशरच्या कंदाची लागवड करण्यात आली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेला पाऊस याचा थोडा फटका केशरला बसला. मात्र हंगाम निघून गेल्यावरही यातील काही कंदांना फुलं आली. महाबळेश्वरच्या मातीत केशर पिकू लागलं.
 
केशराच्या पुढच्या पिकासाठी थोडं थांबावं लागणार आहे. सध्या केशराच्या एका कंदापासून आणखी कंद बनवण्यावर भर दिला जातोय. केशर पिकासाठी पोषक वातावरण, तापमान, समुद्र सपाटी पासूनची उंची या सगळ्या गोष्टी महाबळेश्वर मध्ये जुळून येत आहेत त्यामुळे आता लवकरच बाजारात काश्मीरी केशरसोबत महाबळेश्वरी केशर येणार आहे.