शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

व्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला

WhatsApp group admin
मुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. या कारणामुळे नाराज तीन तरुणांनी चाकूने त्यावर हल्ला केला. घटना अहमदनगर येथील आहे. अहमदनगरच्या 18 वर्षीय चैतन्य याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता ज्यात त्याचे एग्रीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी होते. परंतू एका विद्यार्थ्याला ग्रुपहून बाहेर काढणे जीवावर बेतेल हा विचारही केला नसेल. 
 
अलीकडेच चैतन्यने सचिन गदख नावाच्या एका तरुणाला कॉलेज सोडल्यामुळे ग्रुपमधून डिलीट केले. या साध्याश्या गोष्टीवरून सचिन रागवाला आणि त्याने 17 मे ला रात्री अहमदनगर-मनमाड रोडवर चाकूने चैतन्यवर हल्ला केला. या हल्ल्यात चैतन्य गंभीर रूपाने जखमी झाला असून त्याला पुण्याच्या एका रुग्णालयात भरती केले गेले. 
 
पोलिसांप्रमाणे, हल्लाखोर नेवासाच्या सोनई गावाचा असून फरार आहे. चैतन्यच्या तक्रारीवर सचिन गदख, अमोल गदख आणि दो इतर तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.