शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

शेव-टोमॅटो भाजी

जेवायला पटकन काही कालवण तयार करायचा असेल तर याहून सोपा पदार्थ नसेल कदाचित...
सामुग्री: 1 वाटी शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे.
 
कृती: एका कढईत फोडणी करता तेल गरम करून त्यात मोहर्‍या टाका. तडतडल्यावर मिरच्या, कांदा घालून परता. गोल्डन झाल्यावर टोमॅटो टाका. परतून हळद, तिखट, धणेपूड, मीठ टाकून परतून घ्या. चार वाट्या गरम पाणी घालून उकळून घ्या. उकळू लागले की त्यात शेव टाकून गॅस बंद करा. चवी प्रमाणे कोथिंबीर घालू शकता.
 
विशेष: सर्व्ह करण्याची तयारी असल्यावरच शेव घाला. शेव लसणाची किंवा लवंगांची असल्यास चव छान येते. तसेच पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येऊ शकतं.