मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

चिकन मसाला

साहित्य : ५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ. 
 
कृती : प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकावे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून किमान दोन तास ठेवावे. नंतर कढईत तेल टाकून गरम करावे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकून गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेले चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घ्यावे. झटपट चिकन तात्काळ तयार होईल.