सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

Pudina Sev पुदिना शेव

sev
साहित्य: 
२ कप बेसन, १ पुदिना गड्डी,  ४ हिरव्या मिरच्या, १/४ कप बटर, १/४ टी स्पून हिंग, चिमूट हळद, मीठ चवीने, 
तेल
 
कृती: 
प्रथम पुदिना गड्डी निवडून, धुऊन घ्या. मिक्सरमध्ये पुदिना पाने, हिरवी मिरची, १/४ कप पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घेऊन गाळून घ्या.
 
एका परातीत बेसन व बटर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये मीठ, हिंग, हळद घालून मिक्स करून पुदीनाचे पाणी घालून मिक्स करून शेवेचे पीठ चांगले मळून घ्या. शेवेच्या पिठाला तेलाचा हात लावावा.
 
शेव बनवण्यासाठी शेवेचा सोऱ्या घेऊन बारीक भोक असलेली चकती लावून शेवेचे पीठ त्यामध्ये भरून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये शेव घालून विस्तव मंद करा. दोन्ही बाजूने शेव कुरकुरीत तळून घ्या. शेव थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.