गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (08:04 IST)

वाचा, दहावीचा निकाल कधी लागणार

राज्यातील दहावीचा निकाल पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे.  निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 10वीचा निकाल  जुलै महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागणार आहे.
 
दरम्यान, 25 ते 30 जून दरम्यान प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक  स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत. निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जारी केले आहे. याअंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 
 
3 जुलैपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या स्तरावरील निकालाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्य मंडळाकडून अंतिम निकाल जाहीर होईल, असे संकेत मिळत आहेत.