सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (09:52 IST)

वादग्रस्त माजी उपमहापौर छिंदम निवडणुक लढवणार

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. छिंदम याने निवासस्थान असलेल्या प्रभाग ९ मधून सर्वसाधारण जागेसाठी अर्ज दाखल केला. पत्नीही प्रभाग क्र. १३मधून अपक्ष निवडणूक लढविणार आहे.
 
छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाईलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप मोबाईलवर व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करीत त्याचा उपमहापौरपदाचाही राजीनामा घेतला होता.