बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (12:42 IST)

मध्य प्रदेशातही भाजपच सत्तेचा सूर्य मावळणार

राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशातही भाजपच्या सत्तेचा सूर्य मावळणार असल्याच्या गुप्तचर खात्याच्या अहवालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अतिम शहा यांची झोप उडाली आहे.
 
शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या गुप्तचर खात्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर खात्याने 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे आपला सिक्रेट रिपोर्ट सोपवला आहे.