बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (16:13 IST)

मोहम्मद शमीची पत्नी काँग्रेसमध्ये

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये हसीन जहांनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोहम्मद शमीशी लग्न करण्याआधी हसीन जहां मॉ़डेल होती. शमीसोबत वाद झाल्यानंतर ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल असा अंदाज होता. या वर्षाच्या सुरुवातीला हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. यानंतर हसीन जहांनं शमीविरुद्ध केसही दाखल केली होती. मोहम्मद शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही हसीन जहांनं केला होता.