सोमवार, 9 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 18 मार्च 2024 (11:49 IST)

शिवसेनेसाठी 'काळा दिवस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का म्हणाले

eknath shinde
उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबारचे विधानपरिषद आमदार आमशा पाडवी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी हा काळा दिवस असल्याचे मत व्यक्त केले आहे.  

ते म्हणाले , ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवले त्याच काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. बाळासाहेब म्हणाले काँग्रेसशी हातमिळवणी करण्यापूर्वी मी माझी दुकान बंद करेन. आज त्यांचे पुत्र सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्यासोबत जाऊन बसले आहे. जे आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करतात. आपल्या पंतप्रधानांची बाहेर जाऊन बदनामी करतात. त्यांच्या बद्दल वाईट बोलतात. त्यांच्या सोबत बसणे  हे दुर्देव आहे. 

ज्या शिवतीर्थावरून स्वर्गीय बाळासाहेबांनी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं.त्या शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी अपशब्द म्हटले. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन त्यांना अभिवादन करायला हवे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  
 
Edited by - Priya Dixit