शासनाच्या घोषणेनंतरही महिलांना एसटीच्या तिकिटात सवलत का नाही? वादावादीने कर्मचारी त्रस्त
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.
या घोषणेमुळे सध्या एसटी कर्मचारी त्रस्त असून अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसोबत वादावादी सुरू असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका वाहकाला महिला प्रवाशाच्या नातेवाईकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्तबंबाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.