शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (08:16 IST)

ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का?

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली. त्यांचं म्हणणं हे आहे की विरोधक ओबीसी आरक्षणाबाबत काही गोष्टी पसरवत आहेत. मात्र आम्ही हे त्यांना सांगू इच्छितो की सत्ता पक्षातले मंत्रीच या गोष्टी पसरवत आहेत. त्यांचेच आमदार पत्रही देत आहेत. त्यामुळे अशा मंत्र्यांवर आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 
 
शेतकऱ्यांच्या तोंडाला या सरकारने पानं पुसली आहे. शेतकऱ्यांना या सरकारने कोणतीही मदत केलेली नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीची भूमिका या सरकारने घेतली होती त्या भूमिकेचा सरकारला विसर पडला आहे. हे अधिवेशन घेण्यामागे फक्त आटपून टाकायचं हीच भूमिका दिसून आली.  शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्हाला मिळू शकलेली नाहीत. तीच बाब मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही दिसून आली असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.