1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (10:53 IST)

हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा

Winter session
आपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 डिसेंबर 2018 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. संसदीय कामकाज केंद्रीय समितीने (सीसीपीए) या अधिवेशनाचा कालावधी जाहीर केला. सलग दुसऱया वर्षी हे अधिवेशन डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. संसदेच्या परंपरेनुसार संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्यात पार पडते. पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा संसद अधिवेशन उशिराने घेतले जाणार आहे. यावेळी केंद्राला राफेल पासून ते नोटबंदी श्या अनेक प्रश्नांना समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विरोधक कश्या प्रकारे सरकारला घेरतात की नरेंद्र मोदी नेहमी प्रमाणे सरकारचा बचाव करतात हे दिसणार आहे.