शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (10:51 IST)

जाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण यांची मागणी

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यवतमाळ जिल्ह्याचे कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.
 
या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या की सावकारी जाचा विरोधात कडक कायदा आहे मात्र त्या कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे मात्र अधिकारी तसं करताना दिसत नाही. आमची मागणी आहे की सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी मदत करावी आणि जाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाकावे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या. येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून घेऊ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार ख्याजा बेग यांनी दिले.