मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (08:34 IST)

जागतिक तापमानवाढीचा असा परिमाण होतो

जागतिक तापमानवाढीमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून उघड झाले आहे. ब्रिटनमधील ईस्ट एंग्लिया विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत केलेले संशोधन ‘नॅचर कम्युनिकेशन’या नावाने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
 
जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणातील उष्ण लहरी वीर्यातील प्रजननासाठी आवश्यक असणाऱ्या शुक्रजंतू आणि काही पेशी नष्ट होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. गेल्या काही वर्षात अनेक प्रजातींची संख्या झपाट्याने कमी झाली आहे, याबाबतचा उलगडाही या संशोधनातून होणार आहे. जागतिक तापमानवाढीचा जैवविविधतेवर परिणाम होतो, मात्र, आता हा धोका मानवजातीपर्यंत आल्याचे संशोधक मॅट गेग यांनी सांगितले. वातावरणातील उष्णता वाढल्यास वीर्यातील संवेदनशील गुणधर्मावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले.