सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (14:02 IST)

पेटलेल्या अवस्थेत महिलेची उडी

burn
नगर शहरातील तारकपूर भागात सोमवारी पेटलेल्या अवस्थेत पूजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे या महिलेचे नाव असून तिनी घराच्या गच्चीवरून उडी घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आहे. भाजल्याने जखमाही झाल्या आहेत. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र चुग हिने पेटवून का घेतले? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
 
पूजाला पेटलेल्या अवस्थेत खाली पडताना अनेकांनी पाहिले. त्यावेळी ती जोरजोरात ओरडत होती, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. गजबजलेल्या तारकपूर भागात भर दुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.