गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (13:11 IST)

महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर कोल्हापूर दौर्‍यावर

yashomati thakur
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर सध्या कोल्हापूर दौर्‍यावर आहे. या दरम्यान त्यांनी महिला मेळावा कार्यक्रमानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव बाजीराव खाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे आणि बापू मुसळे यांची भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक मुद्यांवर चर्चा झाली.
 
तसेच यावेळी कोल्हापूरातील महिलांच्या संदर्भातील प्रश्न तसेच इतर सामाजिक व राजकीय मुद्यांवर चर्चा झाली. 
 
Koo App
महिला मेळावा कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव बाजीराव खाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे आणि बापू मुसळे यांनी भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक मुद्यांवर चर्चा झाली. - Yashomati Thakur (@advyashomatiinc) 7 Apr 2022
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या महिला व बाल विकास विभागाबाबत धावता आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्वाचे निर्देश देखील दिले.