बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (17:07 IST)

राज्यात महिला अत्याचारात वाढ

crime
महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग (Molestation) आणि छेडखानीचे (Assulting) सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले असून त्या पाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे.  
 
मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यावर्षी पहिल्या 8 महिन्यांत मुंबईत महिलांचे विनयभंग/अश्लील वर्तनाच्या 1254  घटना नोंदवल्या गेली आहेत तर याच कालावधीत 549  महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येसुद्धा दुप्पट वाढ झाली आहे.
 
मुंबईनंतर राज्यात पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या असून गेल्या आठ महिन्यांत पुण्यात विनयभंग/अश्लील वर्तनाच्या 364 घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात 124 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपुरातही गेल्या 8 महिन्यांत 304  महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत; तर 165  महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या आहेत.