शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (11:44 IST)

17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं असून मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती पुढील तीन दिवस राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आलीये.
 
हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये मुसरळधार पावसाची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अति मुसरळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 
 
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं 19 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर, 19 ऑगस्टला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
 
17 ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट
 
हवामान खात्याने 17 ऑगस्टला राज्याच्या अनेक भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.