शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (07:47 IST)

गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता

chandrakant khaire
आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळं करतोय. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले हा इतिहास आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.
 
चंद्रकांत खैरे म्हणाले की, माझ्या शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कायम राहणार आहे. शिंदेंना धनुष्यबाण मिळू शकत नाही. केंद्रात मोदी सरकार आहे ते हे करणार असेल तर २०२४ मध्ये जनता धडा शिकवेल. शिवसेना संपवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्याची जाण आम्हाला आहे. गद्दारांना नसेल. परमेश्वर तुम्हाला कधी माफ करणार नाही. संघर्ष, संकटे येतात पण शिवसेना संपली नाही. संपणार नाही. बाळासाहेबांवर अनेक संकटे आली होती असंही त्यांनी सांगितले.
 
तसेच आमच्यावर जे संकट आले आहे त्याचा सामना करणार आहोत. उद्धव ठाकरे हे संयमी आणि संघर्षमय नेतृत्व आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदे आणि ४० गद्दारांनी शिवसेना फोडण्याचं महापाप केले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor