रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

त्या मराठी कलाकाराने केली आत्महत्या पुण्यात आणि कला क्षेत्रात खळबळ

पुण्यातील नाट्य आणि सिने क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपले स्थान निर्माण करण्याची धडपड करीत असलेल्या स्वप्नील शिंदे नामक एका ३१ वर्षीय तरुण कलाकाराने अचानक आत्महत्या केली आहे. यामुळे कला क्षेत्रात फार मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहणाऱ्या सदाशिव पेठेतील स्वप्निलने ‘मंत्रा’ या मराठी चित्रपटासह इतर मराठी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी पेलेली होती. तसेच तो पुण्याच्या नाट्यक्षेत्रातील एक सक्रिय कलाकार होता. तसेच त्याची ‘स्वप्न’ नावाची नाट्यसंस्था होती सोबतच तो सीडी विक्रीचाही व्यवसाय करत होता. 
 
स्वप्निलचे सर्वकाही सुरळीत सुरु असताना स्वप्निलने अचानक राहत्या घरी बेडरुममध्ये गळफास घेतला. बेडरुममधून तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या वडिलांनी बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असे दिसले.  त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्वप्निलने नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यामुळे सिने क्षेतातील असलेली स्ट्रगल पुन्हा अधोरेखित झाली आहे.