सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (16:15 IST)

मोबाइल गेमच्या नादात तरुणाची आत्महत्या

पुण्यामध्ये मोबाइल गेमच्या नादात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. संतोष माळी (१९) असे तरुणाचे नाव आहे. सदरची घटना पुण्यातील हवेली तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पेरणेफाटा या भागात घडली आहे. संतोषने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्याने स्पष्टपणे मोबाइल गेमच्या नादात स्वतःचा जीव संपवून आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहीला आहे.
 
वाघोली येथील महाविद्यालयात वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षास संतोष माळी शिक्षण घेत होता. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे रहिवासी असून त्याचे वडील हे एका कंपनीत नोकरी करतात आणि आई गृहिणी आहे. आई-वडील आणि आजीसोबत तो राहत होता. त्याला मोबाइल गेमच प्रचंड वेड असल्याने त्याचे इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नव्हते. पालकांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. मात्र तो कुणाचेच ऐकत नव्हता.