रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (09:43 IST)

भिवापूर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

water death
अमरावती जिल्ह्यात भिवापूर धरणात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाचे मित्र सुदैवाने बचावले. अक्षय नसकरी वय वर्ष 28 असे या मयत तरुणाचे नाव आहे.  

सदर घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून अक्षय आपल्या दोन मित्रांना भिवापूर धरणावर फिरायला आला असता धरण्यातील पाणी पाहून त्यांनी पोहण्याचे ठरवले. पाण्यात उतरल्यावर त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. तिघांपैकी दोघांनी आपला जीव वाचवला आणि पाण्यातून बाहेर आले. मात्र अक्षय खोल पायात बुडू लागला त्याचा जीव वाचवायला मित्रांनी आरडाओरड केली. मात्र तिथे कोणीही नसल्यामुळे अक्षय पाण्यात बुडाला. 

घटनेची माहिती मिळतातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सह शोधपथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू टीम ने घटनास्थळी जाऊन पाहणी केली अक्षयच्या मृतदेहाचा शोध सुरु झाला. सायंकाळी अक्षयचा मृतदेह सापडला. 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit