रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (15:27 IST)

‘अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र

भाजप नेत्याआणि माजी मंत्री पंकजा मुंडे  यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टिकेवरुन आता धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. यांनतर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात अकरा वेळा ढगफुटी झाली आहे आणि तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो असं ते म्हणाले. त्यावेळी धनंजय मुंडे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
 
धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, तुमची चांगली भावना असती तर मागच्या अतिवृष्टीत तुम्ही बांधावर दिसला असता. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेली आहे. मी येथील सर्व परिस्थिती कथन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. बीड जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बीडला सरसकट तातडीने मदत मिळावी अशी आमची मागणी केली आहे. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी स्वत: पंकजा मुंडे या अमेरिकेत गायब झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
 
पु़ढे धनंजय मुंडे म्हणाले, गेल्या काही दिवसात राज्यात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली.या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो.आम्ही रात्री अनेक लोकांना पुरातून बाहेर काढलेले आहे. असं धनंजय मुंडे म्हणाले.