गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (19:39 IST)

Children's Day 2022: मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या पाच चांगल्या सवयी लावा

भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. मुलांवर त्यांचे खूप प्रेम होते.मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.दरवर्षी हा दिवस बाळ दिवस म्हणून साजरा केला जातो.मुलं खूप हळुवार मनाची असतात. ते देशाचे भविष्यही आहे आणि आई-वडिलांचा आधारही आहे. अशा परिस्थितीत मुलाने पुढे जावे, चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात जेणेकरून त्यांचे भविष्य चांगले होईल अशी प्रत्येक पालकाची, शिक्षकाची इच्छा असते. पण त्यासाठी मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत.जेणे करून ते  एक उत्तम नागरिक बनतील. लहान पणापासूनच त्यांना या 5 चांगल्या सवयी लावाव्या चला जाणून घेऊ या.
 
1 वडिलधार्‍यांचा आदर करणे- 
प्रत्येक मुलाने वडिलांचा आदर करणे जाणून घेतले पाहिजे. बालदिनी मुलांना मोठ्यांचा आदर कसा करायचा हे शिकवा. ज्येष्ठांचा सन्मान करणे.दररोज सकाळी अभिवादन   करा. मोठ्यांचा आदर करण्यासोबतच लहानांचाही आदर करायला शिकवा. अशा प्रकारे मुलांमध्ये चांगल्या आचरणाची सवयी लागेल.
 
2 गैरवर्तन न करणे  -
मुलाला योग्य आणि सभ्य भाषा शिकवा. चुकीचे शब्द वापरू नयेत. आयुष्यात काहीही करा पण गैरवर्तन करू नका. मुलांमध्ये चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावा. जेणे करून त्यांना वाईट आणि चांगल्या वागण्यातला फरक कळेल.
 
3 शेअर करणे -
पालकांनी लहानपणापासूनच मुलांमध्ये शेअर करण्याची सवय लावली पाहिजे. प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय मुलामध्ये इतर अनेक चांगल्या सवयी रुजवते. जर मूल एकटे राहून कोणाशीतरी काहीतरी शेअर करायला शिकले नाही तर त्याला समाजातील इतर लोकांसोबत राहणे कठीण होते. म्हणून त्यांना त्यांच्या लहान आणि मोठ्या बंधुभगिनींसोबत ते नसतील तर मित्रांसह शेअर करायला शिकवा.
 
4 रागावर नियंत्रण करणे -
राग हा माणसाचा शत्रू मानला जातो. त्यामुळे मुलांना शिकवा की रागाने कोणतेही काम होत नाही, तर ते बिघडते. तसेच, मुलाला भांडण न करण्यास शिकवा. मुलाला भांडण्याचे नुकसान आणि महान विद्वानांच्या शिकवणी आणि प्रेरणादायी विचारांबद्दल शिकवा.
 
5 स्वतःची कामे स्वता करणे - 
आई-वडील मुलांची सगळी कामे करतात. त्यामुळे मुले त्यांच्यावर अवलंबून राहतात आणि कष्ट करण्याचे टाळतात. पण मुलांमध्ये स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावा. जेणेकरून त्यांना मेहनत करण्याची सवय लागेल. कठोर परिश्रम करून त्यांना भविष्यातही कोणतीही अडचण येणार नाही.

Edited by - Priya Dixit