शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (07:14 IST)

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर; बघा कुणाला कोणते खाते मिळाले?

shinde fadnais
राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सकाळी झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्र्यांचे खातेवाटप आता जाहीर करण्यात आले आहे. मंत्र्यांचे नाव, त्यांचा  आणि त्यांचे खाते खालीलप्रमाणे
 
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री – नगरविकासदेवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री – गृह व अर्थ
 
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर –  महसूल२. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर – ऊर्जा, वन३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे – सार्वजनिक बांधकाम४. विजयकुमार गावित – नंदुरबार – आदिवासी विकास५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव – जलसंपदा६. सुरेश खाडे – मिरज, सांगली – सामाजिक न्याय७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई – गृहनिर्माण८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व – आरोग्य९. मंगलप्रभात लोढा – मुंबई – विधी व न्याय
 
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण – पाणीपुरवठा२. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक – कृषी३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ – ग्रामविकास४. संदीपान भुमरे – पैठण, जालना – रोजगार हमी५. उदय सामंत – रत्नागिरी – उद्योग६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद – उच्च व तंत्रशिक्षण७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद – अल्पसंख्याक विकास८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग – पर्यावरण, पर्यटन९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा – उत्पादन शुल्क