बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

Kids Perfume Unsafe लहान मुलांना परफ्यूम आणि डिओ लावणे किती सुरक्षित? जाणून घ्या

new born baby
Kids Perfume Unsafe लोक शरीर सुगंधी ठेवण्यासाठी परफ्यूम किंवा डिओडोरेंट वापरतात. विशेषतः काही खास प्रसंगासाठी बाहेर पडताना लोकांना परफ्यूम स्प्रे करायला आवडतं. काही लोकांना आपल्या बाळाच्या अंगावर परफ्यूम लावायलाही आवडते. पण याचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या बाळाच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे रासायनिक उत्पादन वापरण्यापूर्वी, त्याचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 
नवजात बाळाची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्याला परफ्यूम किंवा डिओ लावण्याची शिफारस केली जात नाही. परफ्यूम किंवा डिओडोरंट्समध्ये अशी रसायने असतात जी त्यांच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचवू शकतात. प्रत्येक पालकाने बाळाच्या त्वचेच्या आरोग्यास प्राधान्य देणे महत्वाचे आहे. तज्ञांप्रमाणे बाळाच्या त्वचेवर परफ्यूम किंवा डिओडोरंट लावल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही पालकांनी आपल्या बाळाला परफ्यूम लावणे टाळतील.
 
त्वचेची जळजळ- परफ्यूम किंवा डिओडोरंटच्या सुगंधात अशी रसायने असू शकतात ज्यामुळे बाळाच्या संवेदनशील त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे बाळाच्या त्वचेवर लालसरपणा, पुरळ किंवा खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
 
लहान मुलांना ऍलर्जी- लहान मुले कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीसाठी अधिक संवेदनशील असतात. परफ्यूम किंवा डिओडोरंट्समध्ये असलेल्या रसायनांमुळे मुलांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे बाळाच्या त्वचेवर खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
 
श्वास घेण्यास त्रास होणे- अर्भकांमध्ये विकसित होत असलेल्या श्वसन प्रणालीमुळे, परफ्यूम किंवा डिओ किंवा इतर कोणत्याही उत्पादाच्या तीव्र सुगंधाच्या संपर्कात आल्याने श्वसनाच्या समस्या वाढू शकतात.
 
बाजारात किड्स परफ्यूम देखील उपलब्ध असतात जे पालकांना आकर्षित करतात परंतु कोणतेही उत्पाद वापरण्यापूर्वी आणि ते देखील बाळांच्या बाबतीत तर त्याबद्दल पुन्हा विचार करण्याची आवश्यकता असते. अशात विचारपूर्वक निर्णय घेऊन आपण आपल्या बाळाला कोणत्याही गैरसोयीपासून सुरक्षित ठेवू शकता.