शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 27 जानेवारी 2024 (11:37 IST)

Friendship Tips: स्वार्थी मित्रांना असे ओळखा, दूर राहण्यासाठी मदत होईल

friendship breakup
मैत्रीचे नाते खूप खास असते. मित्रच असतात ज्यामुळे आपण आयुष्यात आनंदी राहू शकतो. मित्रांसोबतच आपण आपल्या खाजगी गोष्टी देखील शेअर करतो. त्यांच्या सोबत मनमोकळेपणे हसू शकतो फक्त हेच नाही तर गरज असतांना आपल्याला आधी मित्रांचीच आठवण येते. पण कधी कधी आपली मैत्री अश्या लोकांशी होते जे केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मैत्री करतात. जेव्हा आपल्याला गरज असते किंवा आपण त्यांना एखादी मदत मागतो तेव्हा ते नकार देतात. आणि आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही आपण हा विचार करतो की आपण जर काही बोललो तर आपली मैत्री तुटून जाईल,त्यामुळे जरूरी आहे की वेळेत आशा मित्रांना ओळखा आणि त्यांच्या पासून अंतर ठेवा. 
 
फक्त स्वताचा विचार करणारा मित्र -
आपल्या सर्वांची भेट कधीना कधी अश्या लोकांसोबत होते जे केवळ स्वताचा विचार करतात. आणि स्वतचे काम करवून घेण्यासाठी कुठल्यापण थराला जातात . ते प्रत्येक गोष्टीत स्वत:चा फायदा बघतात. तसेच दुसऱ्यांची  मदत करतांना हाच विचार करतात की माझा फायदा कसा होईल. जर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणी अस असेल तर शक्य असल्यास तेवढे त्यांच्या पासून दूर रहावे. कारण असे लोक कधीच कोणाची मदत करत नाही. व स्वत:चा स्वार्थ बघतात. 
 
बहाणा बनवायला सगळ्यात आधी -
काही लोक असे असतात जे फक्त मोठया मोठया गोष्टी करतात. तुम्ही त्यांच्याशी जेवढा वेळ बोलाल तेवढ तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांचे खास आहात आणि ते तुम्हाला जास्त महत्व देत आहे. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा ते सर्वप्रथम   बहाणा बनवतात. तुमची मदत करायला नकार देतात. जर तुमच्या मित्रांमध्ये असा एखादा मित्र असेल तर त्याला वेळीच ओळखा.
 
महत्वाची माहिती गुपित ठेवण्यात कुशल -
जर तुमचा मित्र तुमच्या पासून महत्वाची गोष्ट लपवत असेल. किंवा त्याला तुम्हाला काहीही महत्त्वाचें सांगायचे नसेल तेव्हा ते म्हणतात की विसरून गेलो किंवा माझ्या  लक्षात  नाही. अशा  प्रकारे बहाणा बनवत असल्यास  तर समजून जावे  की तो मित्र स्वार्थी आहे. आणि तो तुम्हाला कधीपण धोका देवू शकतो.
 
गरजेच्या वेळेस निघून जाणे -
जर तुम्हाला कुठल्यापण प्रकारची काही समस्या असेल तर आणि तुम्हाला एखाद्या मित्राची जास्त गरज असेल आणि तो तुम्हाला प्रत्येक वेळी नकार देत असेल तर किंवा जाणून कुठलापण बहाणा बनवत असेल तर तुम्ही अश्या  मित्रापासून दूर राहिलेले बरे. जर तो वारंवार असे करत असेल तर सावधगिरी बाळगा.