शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (23:06 IST)

Marriage Tips :लग्नानंतर प्रत्येक पतीने हे काम करावे, बायकोला सासरी त्रास होणार नाही

Family
लग्नानंतर मुलगा आणि मुलगी यांच्या आयुष्यात खूप बदल होतात. एक मुलगी लग्नानंतर आपले कुटुंब आणि घर सोडून पतीच्या घरी राहू लागते. मुलीला तिच्या पतीच्या कुटुंबाला आपलेसे करून घ्यावे लागते . त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. सासरच्या लोकांच्या आवडीनिवडी, नापसंती, वागणूक याबद्दल तिला माहिती नसते.अनेक वेळा नववधूला सासरच्या लोकांमध्ये मिसळण्यात अडचण येते.अशा परिस्थितीत पत्नीला कुटुंबात सहज सामील करून घेण्यासाठी काही महत्त्वाचे काम करणे हे पतीचे कर्तव्य बनते. पुरुषांसाठी या काही टिप्स आहेत, ज्याचा अवलंब केल्यास लग्नानंतर पत्नीला सासरच्या लोकांशी जुळवून घेण्यात त्रास होणार नाही.चला तर मग जाणून घेऊ या . 
 
पत्नीला कुटुंबाबद्दल माहिती द्या-  
प्रत्येक पतीने लग्नानंतर पत्नीला आपल्या कुटुंबाबद्दल सांगावे. पत्नीला कुटुंबात मिसळता यावे, आपल्या आई-वडिलांचा स्वभाव, त्यांच्या आवडी-निवडी याची माहिती द्यावी. त्यामुळे वधूला कुटुंबाशी जुळवून घेणे सोपे जाते.  
 
घरची दिनचर्या सांगा -
लग्नानंतर पत्नी जेव्हा नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तिला घरच्यांकडून एक वेगळंच वातावरण मिळतं. सासरचे लोक कसे राहतात हे तिला माहीत नसते. घराची दिनचर्या कशी आहे  हे  माहिती नसते. अशा वेळी पतीने पत्नीला घरातील दिनचर्या सांगायला हवी. तिला प्रत्येकाच्या नाश्त्याची किंवा दुपारच्या जेवणाची वेळ काय आहे ते सांगा जेणे करून ती कुटुंबाच्या वेळापत्रकानुसार स्वत: ला तयार करू शकेल. 
 
बायकोची आवड जाणून घ्या -
बायकोला सासरच्या घराविषयी सांगण्यासोबतच बायकोची आवड आणि राहणीमानही जाणून घ्या. जेव्हा पती पत्नीचा स्वभाव आणि जीवनशैली समजून घेतो, तेव्हा त्यानुसार तो पत्नीचा कुटुंबाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करू शकतो. 
 
पत्नीच्या कुटुंबाशी जिव्हाळा ठेवा -
लग्नानंतर पत्नीला सासरच्या घरात जुळवून घेता यावे यासाठी पतीने पत्नीला सासरच्या घरात एकटेपणा वाटू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पत्नीची भावंडांशी मैत्री करा. एकत्र फिरायला जा. जेव्हा एखादी मुलगी तिच्या पतीसोबत तसेच सासरच्या मंडळींसोबत फिरायला जाते तेव्हा ती त्यांच्यात मिसळून जाते.
 
Edited By - Priya Dixit