Dharma Sangrah
✕

Parenting Tips: मुलाला घरी एकटे सोडताना पालकांनी या गोष्टीची काळजी घ्यावी

Updated: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (21:37 IST)
 
पती-पत्नी दोघेही नोकरी करतात आणि त्यांना ऑफिसला जावं लागतं, तेव्हा सगळ्यात मोठी समस्या असते ती मुलाला घरी एकटं सोडण्याची. अशा परिस्थितीत जर आई-वडील मुलाला नोकरीसाठी घरी एकटे सोडत असतील तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
 
1 न्यूक्लियर फॅमिली असल्यास -
तुम्ही न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहत असाल आणि पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील, तर लहान वयातच मुलाला घरी एकटे सोडणे टाळा. मूल थोडे मोठे असले तरी त्याला घरी एकटे सोडू नका, तर त्याला विश्वासार्ह व्यक्तीच्या देखरेखीखाली ठेवा. जर तुम्ही नोकर किंवा केअर टेकर ठेवत असाल तर त्याचे आधी पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या.
 
2 सुरक्षेकडे लक्ष द्या- 
जर नोकरदार पालक आपल्या मुलांना घरी एकटे सोडून बाहेर जात असतील तर सर्वप्रथम घरी कॅमेरे बसवा. जेणे करून तुमच्या अनुपस्थितीतही तुम्ही घरात एकटे असलेल्या मुलावर लक्ष ठेवाल, तो काय करतोय, कसा राहतोय.
 
3 वडिलधाऱ्यांवर जबाबदारी द्या -
पालक कामा निमित्त घराबाहेर जात असतील आणि मूल घरी एकटे असेल तर मुलाची जबाबदारी कुटुंबातील ज्येष्ठांवर द्या. यामुळे मुलाला आई-वडिलांची उणीव भासत नाही आणि घरातील वडीलधारी मंडळी ही मुलाची चांगली काळजी घेतात.
 
4 मुलांना वेळ द्या-
कामामुळे तुम्ही मुलाला वेळ देऊ शकत नाही. त्याला घरी एकटे सोडून ऑफिसला निघून गेल्याने मुलाला आई-वडिलांशिवाय एकटे वाटू लागते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या खास प्रसंगी मुलासोबत वेळ घालवा. त्याला फिरायला घेऊन जा किंवा शाळेच्या उपक्रमात सामील व्हा.
 
5 सतत संभाषण करा -
जरी तुम्ही मुलाला रोज कामानिमित्त घरी सोडून जात असल्यास,वेळोवेळी त्यांना फोन करून त्यांची स्थिती जाणून घ्या. मुलाने जेवले  की नाही ते विचारा, तो काय करत आहे, तो कसा आहे वेळोवेळी फोन करून विचारा. जेणेकरून त्याला तुमची आठवण येऊ नये.
 
 Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

करवा चौथ विशेष: नैवेद्याचा शाही बेत – रसाळ हलवा आणि गरमागरम पुरी!

Karwa Chauth 2026 Wishes in Marathi करवा चौथच्या शुभेच्छा

रक्तदान केल्यानंतर काय करू नये? आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांसाठी नोकरीची संधी! वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यकांच्या ६५ पदांसाठी भरती

पुढील लेख
Show comments