26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस मुख्य अतिथि कोण? कशी करतात निवड?
President of france emmanuel macron 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक वर्ष कोणत्यापण देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतिना मुख्य अतिथि रुपात बोलवण्याची परंपरा आहे. यासोबतच देश विदेशातील इतर गणमान्य नागरिकांना निमंत्रण दिले जाते. जे पहिल्या पंक्तीत बसतात. वर्ष 2024 च्या प्रजासत्ताक दिन यादिवशी पण ही परंपरा पाळली जाईल
या वर्षी कोण राहतील मुख्य अतिथि भारताने यावेळेस प्रजासत्ताक दिवशी फ्रांसचे राष्ट्रपति इमैनुएल मैक्रॉन यांना आमंत्रित केले आहे. प्रजासत्ताक दिन मध्ये मुख्य परेड मध्ये अतिथि राहतील. प्रजासत्ताक दिन या दिवशी समारंभात मुख्य अतिथिच्या रूपात सहभागी होण्याकरिता भारतातून मिळालेल्या आमंत्रनाला करीता फ्रांसचे राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों म्हणालेत की- थैंक्यू माय डियर फ्रेंड. यावर नरेंद्र मोदी म्हणालेत की तुमचे खूप खूप स्वागत आहे मिस्टर प्रेसीडेंट. सोबत त्यांनी दोघांचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच ते साहवे फ्रांसीसी नेता बनतील. ज्यांना भारताने हा सम्मान प्रदान केला आहे. यावर्षी आपण भारत-फ्रांस रणनीतिक साझेदारीची 25 वी वर्षगांठ साजरी करणार आहोत.
जयपूरमध्ये वेलकम शो फ्रांसचे राष्ट्रपति मैक्रों 25 जानेवारीला जयपुरला पोहचणार आहेत. नरेंद्र मोदीजी 25 जानेवारीला जयपूरच्या प्रस्ताविक दौऱ्यावर राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मैक्रों हे जयपूरमध्ये रोड शो करतील. हा रोड शो सांगानेरी गेट पासून सुरु होईल. रोड शो जोहरी बाजार, बढ़ी चौपड़ पासून जावून त्रिपोलिया गेटजवळ पोहचतील. दोघांचा रोड शो त्रिपोलियाच्या आत जंतर-मंतर , सिटी पॅलेस , हवामहल पोहचतील. हवामहलपासून रोड शो परत सांगनेरी गेट जाईल. या नंतर मोदीजी सांगानेर पासून होटेल रामबा करीता रवाना होतील.
बैस्टिल डे परेड मध्ये सहभागी झाले होते मोदीजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 जुल्लैला पेरिस मध्ये आयोजित बैस्टिल डे परेड मध्ये सन्मानित अतिथि म्हणून भाग घेतला होता. हा कार्यक्रम फ्रांसच्या राष्ट्रीय दिवस समारोहचा हिस्सा आहे. मग मैक्रों सप्टेंबर मध्ये नवी दिल्लीत आयोजित 20 शिखर सम्मलेन मध्ये सहभागी झाले होते.
कशी निवड होते मुख्य अतिथिची मुख्य अतिथि कोणाला बनवले पाहिजे,हे विदेश मंत्रालय विचार विमर्श करून ठरवते. यात भारत आणि त्या देशाच्या संबंधाला लक्ष्यात घेतले जाते. यावर पण विचार केले जातो की आमंत्रित अतिथिला बोलावण्याने कुठल्या अन्य देशाच्या संबंधावर परिणाम तर होणार नाही ना या सर्व गोष्टींवर विचार केल्या नंतर मुख्य अतिथीचे नाव ठरते या नंतर यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपति यांची मंजूरी घेतली जाते. मंजूरी नंतर आमंत्रित केलेल्या अतिथीची उपलब्धता पाहून त्यांना निमंत्रण पाठवले जाते मुख्य अतिथिच्या लिस्टमध्ये अजून काही नावे असतात. पहिल्या क्रमपासून याची निवड करतात. ही प्रक्रिया 6 महिन्यांपूर्वीच प्रारंभ होते.
मुख्य अतिथिचा सत्कार कसा करतात मुख्य अतिथिला रेड कार्पेट टाकून त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' दिले जाते. दुपारी मुख्य अतिथिला पंतप्रधान व्दारा भोजनचे आयोजन असते. संध्याकाळी राष्ट्रपति त्यांच्यासाठी विशेष स्वागत समारोह आयोजित करतात त्यांतर सकाळी परेडमध्ये सहभागी होतात.