मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

अमेरिकन निवडणुकीतील मुद्दे आणि गुद्दे

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा सहा मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. पहिल्यांदाच या मुद्यांवरुन निवडणूक इतकी रंगली. डेमोक्रेटीक आणि रिपब्लिकन पक्षाचे या बाबतीत काहीसे मतभेद होते परंतु उभय पक्षांनी हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे मान्य केले आहे. आणि याच कारणाने ही निवडणुक खालील सहा मुद्द्यांवर लढली गेली.

इराक मुद्द्यांवरून अमेरिकेत निवडणुक प्रचार चांगलाच रंगला

इराक हा मुद्दा अमेरिकी जनतेसाठी महत्त्वाचा असून, याकडे नवीन दृष्टिकोन बाळगण्याची गरज असल्याचे ओबामांनी स्पष्ट केले, इराकमधून अमेरिकी फौजांना माघारी बोलवण्यात येणार असल्याचेही ओबामा म्हणाले.

दुसरीकडे मेक्कन यांनी इराक युद्धाचे समर्थन केले. परंतु बुश यांनी चुकीच्या पद्धतीने हे युद्ध लढल्याचे ते म्हणाले. इराकमध्ये सैनिकांची संख्या वाढवण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला होता.

आऊटसोर्सिंग चा मुद्दा प्रथमच अमेरिकी निवडणुकांमध्ये आला

अमेरिकेत वाढत्या आऊटसोर्सिंगच्या कामांमुळे देशात बेकारी झपाट्याने वाढत असल्याचे या दोनही पक्षांनी मान्य केले.

आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर अतिथी कामगार कार्यक्रमाची अंबलबजावणी करण्यात येणार असल्याचे ओबामांनी स्पष्ट केले. देशात बेकायदा राहणाऱ्या परराष्ट्रीयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. इंग्रजी भाषा शिकण्यावरही त्यांनी भर दिला.

दुसरीकडे मेक्कन यांनी यासंदर्भात कडक नियम करण्याचे आश्वासन दिले. त्यांनीही अतिथी कामगार कार्यक्रमाचे समर्थन केले.

आरोग्य सेवा विषयावरही या निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस झाला

नॅशनल हेल्थ इंशोरंन्सची स्थापना करण्याचे आश्वासन देत देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मोफत देण्यात येतील असे आश्वासन ओबामांनी आपल्या भाषणांतून दिले.

तर दुसरीकडे गरीब कुटुंबांना आरोग्य सेवांसाठी पाच हजार डॉलरची सूट करातून देण्याचे आश्वासन मेक्कन यांनी दिले. चिर्ल्डन हेल्थ कार्यक्रमाची अंबलबजावणीही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेत बदलत चाललेल्या शिक्षणावरही चर्चेचे गुऱ्हाळ चालले

नो चाइल्ड लेफ्ट बिहाईंड कायद्याचा ओबामांनी विरोध केला. या कायद्याच्या अंबलबजावणीसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे कारण यासाठी त्यांनी पुढे केले.

दुसरीकडे मेक्कन यांनी या कायद्याचे समर्थन केले होते. आपण निवडून आलो तर हा कायदा अमलात आणणार असल्याचे ते म्हणाले.

समलैंगिकतेचा मुद्दा या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरला

बदलत चाललेली अमेरिकी संस्कृती आणि देशात घडणाऱ्या अपराधांवर आळा घालण्यासाठी देशात समलैंगिक लग्नांना मान्यता द्यावी अशी मागणी होत असतानाच ओबामांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले तर मेक्कन यांनी मात्र या गोष्टीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते.

अमेरिकेत गर्भपात करण्यास न्यायालयीन मंजुरी आहे, त्यामुळे याही विषयावर चर्चा झाल

गर्भपात हा महिलांचा अधिकार असून, त्यांना तो मिळावा असे मत ओबामांनी व्यक्त केले होते. परंतु यासह महिलांनी त्यांना किती मूल व्हावी हे निश्चित केले पाहिजे असेही ओबामा म्हणाले.

मेक्कन यांनी 1973 साली अमेरिकी सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेल्या गर्भपात कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे. केवळ अत्याचारित महिलेलाच याचे अधिकार मिळावेत असे त्यांचे मत आहे.