भारताची झेप आणि चांद्रयान
| पीएसएलव्ही-सी 11 या रॉकेटच्या माध्यमातून हे यान झेपावले. 50 हत्तींचे वजन एकत्र केल्यानंतर जेवढे वजन होईल तितकेच वजन या रॉकेटचे असून, अंतराळात पोहचल्यानंतर हे यान सर्वात प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. यानंतर दोन वर्ष हे यान चंद्राचा अभ्यास करून चंद्राचे रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करणार आहे. साऱ्या बंधनांना तोडत हे यान भारतीय तिरंगा घेऊन शुन्यमंडळाला भेदते झाले आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यात पाणी तरळले. भारताने प्रथमच संपूर्ण चांद्रमोहीम यशस्विरीत्या पूर्णं केली आहे. या मोहिमेमुळे इस्रो आणि भारतीय वैज्ञानिकांचा दबदबा साऱ्या जगाला मान्य करावा लागणार आहे. या मोहिमेनंतर वैज्ञानिकांनी दिवाळी साजरी केली. तर भारतीय नागरिकांनीही एकमेकाना शुभेच्छा देत या मोहिमेचा यशस्वितेचा आनंद साजरा केला.या मोहिमेचा हा संक्षिप्त आढावा.
|

