रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By

बॉलीवूड 2018 : अभिनेत्रींचा स्कोअर कार्ड

वर्ष 2018 मध्ये बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींचे स्कोअरकार्ड कसे राहिले? कोणी किती हिट सिनेमा दिले आणि किती फ्लॉप? जाणून घ्या वर्षभराचे लेखापरीक्षण
आलिया भट्ट
आता आलिया भट्ट इतकी मोठी स्टार झाली आहे की केवळ स्वत:च्या जोरावर सिनेमा हिट करवण्यात सक्षम झाली आहे. राजी या गोष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे. यात ती एकटी स्टार कलाकार होती. सिनेमा खूप पसंत केला गेला आणि शंभर कोटी क्लब मध्ये सामील देखील झाला. यात आलियाची भूमिका देखणी होती.
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 1
हिट : 0
औसत : 0
फ्लॉप :
0
 
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा हिला परी चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. यात तिची भूमिका देखील उत्तम होती परंतू बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा जादू नव्हता. संजू सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात ती दिसली. सुई धागा यात तिने अत्यंत साधारण लुक दाखवून 
 
प्रेक्षकांचे मन जिंकले. परंतू झिरोमध्ये वेगळी भूमिका साकारली असूनही सिनेमाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले नाही.
 
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 1
औसत : 1
फ्लॉप : 1
 
कॅटरीना कॅफ
ठग्स ऑफ हिन्दोस्तान मध्ये कॅटरीना कॅफच्या भूमिकेची लांबी बघून फँसचे डोके फिरले. करियरच्या या पायरीवर अशा चित्रपटाची काय गरज पडली हे कोणालाही कळले नाही. चित्रपट फसला आणि झिरोला निराशा हाती लागली. 
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
औसत : 0
फ्लॉप : 2

श्रद्धा कपूर
मागील वर्ष श्रद्धासाठी विशेष नव्हता परंतू 2018 तिच्यासाठी आनंदी ठरला. चि‍त्रपट स्त्री सुपरहिट राहिला आणि श्रद्धाच्या अभिनयाबद्दल चर्चा देखील झाली. तरी बत्ती गुल मीटर चालू चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले.
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 1
हिट : 0
औसत : 0
फ्लॉप :1
जॅक्लीन फर्नांडिस
जॅक्लीनच्या जादू या वर्षी चालला नाही. रेस 3 मध्ये सलमान खान असूनही चित्रपट प्रेक्षकांनी सर्रास नाकारला. 'बागी 2' मध्ये माधुरीच्या 'एक दो तीन' गाण्यावर तिने डांस केला आणि त्यामुळे ही प्रेक्षकांची टीका देखील सहन करावी लागली. 
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
औसत : 0
फ्लॉप : 1
 
सोनाक्षी सिन्हा
हॅपी फिर भाग जाएगी यात सोनाक्षीचा जादू मुळीच कामास आला नाही. आता तिला सिनेमात करण्यात रस नाही असे वाटू लागले आहे.
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
औसत : 0
फ्लॉप : 1
 
दीपिका पादुकोण
एकच चित्रपट 'पद्मावत' याने दीपिका पादुकोणने असा धमाका केला की सिनेमा वर्षभर चर्चेत होता. राणी पद्मावतीची भूमिका तिने प्रामाणिकपणे साकारली आणि तिच्या करियरसाठी हा सिनेमा संस्मरणीय ठरला. अनेक विरोध सहन केल्यावरही सिनेमा  ब्लॉकबस्टर ठरला. शाहिद आणि रणवीर सारखे कलाकार असल्यावरही दीपिकामुळे चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. वर्षाशेवटी तिने रणवीर सिंह यासोबत विवाह केला.
 
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 0
औसत : 0
फ्लॉप : 0
 
तापसी पन्नू
2017 प्रमाणेच 2018 मध्ये देखील तापसी पन्नूचे चार चित्रपट रिलीज झाले. सिनेमाने चांगले प्रदर्शन केली नाही परंतू तापसीच्या भूमिकेची प्रशंसा झाली. दिल जंगली कोणालाही लक्षात नाही परंतू सूरमा या चित्रपटात तापसीचे अभिनय उत्तम होते. बॉक्स ऑफिसवर देखील हे चित्रपटात सामान्य राहिले. मुल्क उत्तम सिनेमा ठरला आणि त्यात तापसीची भूमिका चांगली होती परंतू सिनेमाला प्रेक्षकांनी नाकारले. हीच परिस्थिती मनमर्जियां या चित्रपटाची होती.
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 0
औसत : 1
फ्लॉप : 3
 

 
करीना कपूर खान
दोन वर्षानंतर करीना कपूर खान बिग स्क्रीनवर दिसली. वीरे दी वेंडिंग बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. तसेच करीनापेक्षा वर्षभर तिचा मुलगा तैमूर अली खान अधिक चर्चेचा विषय ठरला.
 
ब्लॉकबस्टर : 0
सुपरहिट : 0
हिट : 1
औसत : 0
फ्लॉप : 0
 
सोनम कपूर
सोनम कपूरसाठी 2018 उत्तम ठरला. पॅडमॅन आणि वीरे दी वेंडिंग हिट ठरली आणि संजू देखील ब्लॉकबस्टर. या वर्षी सोनम लग्नाच्या बेडीत अडकली.
 
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 2
औसत : 0
फ्लॉप : 0