रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (17:58 IST)

Sharad Purnima 2022 Upay कोजागिरी पौर्णिमा 5 अत्यंत सोपे उपाय

शरद पौर्णिमेचे सोपे उपाय
 
1. पांढरे फुलं जसे गुलाब, चंपा, चमेली, चांदणी, कुमुदनी, पांढरे मोती, पांढरे फळ, पांढरे वस्त्र, पांढरे धान्य जसे तांदूळ, पांढरी मिठाई जशी खीर हे सर्व चंद्र आणि श्रीकृष्णाला अर्पित करावे.
 
2. महालक्ष्मी देवीला पिवळ्या आणि लाल रंगाची सामुग्री अर्पित करावी.
 
3. बासरीला मोरपीस बांधून पूजन करावे.
 
4. तुपाचा अखंड दिवा लावावा त्यात 4 लवंगा ठेवाव्या.
 
5. घरात पाणी ठेवत असलेल्या जागेवर स्वस्तिक काढावे.
 
शरद पौर्णिमेला रात्री केलेल्या पूजनामुळे वर्षभर लक्ष्मी देवी आणि कुबेराची कृपा प्राप्ती होते. या व्यतिरिक्त मनोबल वाढतं, स्मरण शक्ती आणि सौंदर्य यात देखील वृद्धी होते. देवी लक्ष्मी या दिवशी विशेष प्रसन्न असते कारण असे म्हणतात की याच दिवशी समुद्र मंथनातून देवी प्रकट झाली होती..अशात देवीकडून इच्छित पूर्ण होणे संभव होतं. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना केली पाहिजे.
 
शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीची या दोन मंत्रांनी पूजा करावी-
 
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
 
भागवत महापुराणात असे सांगितले आहे की जर आपण भाग्य, सौभाग्य मिळवू इच्छित असाल तर शरद पौर्णिमेला चंद्र देवाची या मंत्राने पूजा करावी. नंतर चांदीच्या भांड्यात दूध- खडीसाखरेचा प्रसाद दाखवावा-
 
"पुत्र पौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे।"