समर्थ गुरु रामदास यांच्याबद्दल शिवाजींची श्रद्धा
एकदा छत्रपती शिवाजींचे गुरुदेव समर्थ रामदास गुरु भिक्षेसाठी जात असे. तेवढ्यात त्यांना शिवाजींचे दर्शन झाल्यास शिवाजींनी गुरूस अभिवादन केले आणि म्हणाले "गुरुदेव मी आज पासून माझे सर्व राज-वैभव आपल्याला अर्पण करतो. गुरुदेव यावर उत्तरले "राजे आपण हे परत मागणार तर नाही"? राजे म्हणाले अजिबात नाही, हे संपूर्ण राज्य आपलेच आहे गुरुदेव.
तेव्हा समर्थांनी आपल्या वस्त्रातून फाडून एक तुकडा राजेंच्या मुकुटावर बांधला आणि म्हणाले "की मग आज पासून मी माझे राज्य आपल्या स्वाधीन करतो. आपण ह्या राज्यांचा सांभाळ करून याची काळजी घेऊन याचा व्यवस्थित सांभाळ करावा. राजेंचे डोळे हे बघून पाणावले. आपण माझी भेट मलाच परत करीत आहात. असे ते गुरूंना म्हणाले.
गुरूंनी त्यांना उत्तर दिले की राजे मला या राज्याला धर्म राज्य करावयाचे आहे. आपण याचा सांभाळ करावा आणि माझे वारस म्हणून राज्य करा. मी सदैव आपल्याबरोबर आहे. हे एकून राजे म्हणाले "मग ठीक आहे गुरुदेव मी आपणास वचन देतो की या राज्यांचा ध्वज नेहमी भगवा असेल." नेहमी आनंदी राहा !! असे म्हणून रामदास भिक्षेसाठी निघून गेले.
तात्पर्य : शिवाजी महाराजांचे आपल्या गुरूस राज्य समर्पित करणे आणि गुरूने ते परत देणे. एकमेकांवरची श्रद्धा आणि प्रेमाचे द्योतक आहे.