जेव्हा छत्रपती शिवाजीं महाराजांनी बिबट्याला ठार मारले
पुण्यातील नाचणी गावात एक बिबट्याने उच्छाद मांडला होता. तो माणसांची बळी घेत होता. गावात हल्ला करून जंगलात पळून जायचा. त्याला घाबरून आपले प्राण वाचविण्याची विनंती घेऊन सर्व गावकरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली.
गावकरी म्हणाले तो बिबटया आम्हाला झोपलेले बघून आमच्यावर हल्ला करतो. आमचे कितीही मुलं-बाळं त्याने नेले आहे. असे म्हणून त्यांना रडू कोसळले. त्यांना धीर देत महाराज म्हणाले "आपण काही काळजी करू नका मी नेहमीच आपल्या मदतीसाठी आहे."
बिबट्याला ठार मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येसजी व काही सैनिकांना बरोबर घेऊन गेले. बिबट्याला बघूनच बरोबर आलेले सैनिक पळून गेले पण छत्रपती शिवाजी महाराज आणि येसजींने त्या बिबट्यावर आक्रमण करून त्याला ठार मारले. गावकरी आनंदित होऊन छत्रपती शिवाजीं महाराजांचा जयघोष करू लागले.