शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

श्राद्ध करताना काय करावे आणि काय नाही (10 गोष्टी)

श्राद्धामध्ये काही वस्तूंचे विशेष महत्त्व आहे आणि काही गोष्टींचा मनाई आहे. जाणून घ्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी....

महत्त्वपूर्ण वस्तूंमध्ये चांदीचे भांडे, चांदी , कुश, गाय, काळे तीळ आहे.
कुश आणि काळं तीळ भगवान विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न माले आहेत आणि चांदी प्रभू शिव यांच्या नेत्रांद्वारे उत्पन्न झाल्याचे मानले आहेत.
महुआ आणि पलाश पत्र अत्यंत पवित्र मानले आहे.
गायीचं दूध, गंगाजलाचा प्रयोग श्राद्धाचं कर्मफल अनेकपट वाढून जातं.
तुलशीच्‍या प्रयोगाने पितृ अत्यंत प्रसन्न होतात.

पूर्वजांना वर्ण रजत समान धवल आणि उज्ज्वल असतं म्हणूनच त्यांच्या कर्मात श्वेत आणि हलक्या गंधाच्या फुलांचा प्रयोग योग्य मानला आहे.
श्राद्ध स्थान शेणाने पोतून शुद्ध केले जातं. तीर्थ स्थळी श्राद्ध करणे अनेकपट फलदायी मानले आहे.
श्राद्धात निषिद्ध दंतधावन, तांबूल सेवन, तेल मसाज, उपास, स्त्री संभोग, औषध ग्रहण तामसिक मानले आहे. 
पितळ आणि कांस्याचे पात्र शुद्ध मानले आहेत. लोखंडी पात्र अशुद्ध मानले आहेत.
गंधामध्ये खस, श्रीखंड, कापूर सहित पांढरे चंदन पवित्र आणि सौम्य मानले आहे इतर सर्व निषिद्ध आहे.