शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (10:05 IST)

श्राद्ध करणे जमले नाही? तर हे उपाय करा, पितरांना आशीर्वाद मिळेल

श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष आपल्या पितरांना स्मरण्याची संधी आहे. श्राद्ध पक्षात दररोज सकाळी नित्यकर्म केल्यावर पाण्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना पाणी घालावं. श्राद्धाच्या दररोज सकाळी 9 वाजेच्या पूर्वी पितरांना पाणी घाला. 
पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांना समाधान मिळतं ज्यामुळे ते आनंदी होतात, परंतु काही लोकांना तिथी आणि पूजेची माहिती नसते. ज्यामुळे त्यांना श्राद्ध करता येत नाही. अश्या परिस्थितीत पितृदोषामुळे त्यांचा आयुष्यात बऱ्याच समस्या कायम राहतात. म्हणून पुराणानुसार, आपल्या पितरांना प्रसन्न आणि संतुष्ट करण्यासाठी काही विशेष उपाय देखील केले जाऊ शकतात. 
 
श्राद्ध करता येत नसल्यास हे उपाय करावे -
  
* सकाळी अंघोळ करून तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यामध्ये गायीचे कच्चं दूध, जवस, तीळ आणि तांदूळ घाला. मग दक्षिणेकडे तोंड करून त्या पाण्याला पिंपळात घालावं. असे केल्यास पितरं प्रसन्न होतात. 
 
* गायींना हिरवा चारा द्या आणि गोठ्यात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून पाण्यात कच्चं दूध मिसळून पितरांना अर्पण करावे. याने पितरं प्रसन्न होतात. 
 
* पितृपक्षात दररोज ब्राह्मणाला जेवू घालावं किंवा एखाद्या देऊळात बाह्मणाला दररोज अन्न सामग्री (गव्हाचे पीठ, तूप, फळ,गूळ आणि भाजी) देणगी द्या. त्याच बरोबर आपल्या श्रद्धेनुसार दक्षिणा द्या. 
 
* सर्व पितृमोक्ष अवसेला तांदुळाच्या पिठाचे पिंड करून त्यावर जवस आणि तीळ घाला. नंतर ते पांढऱ्या कापड्या मध्ये ठेवून पलाशच्या पानावर ठेवून नदीच्या प्रवाहात वाहून द्या. 
 
* घरात ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतात तिथे सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्याने पितरं प्रसन्न होतात.
 
* गायीचे शेण वाळवून तयार केलेल्या गवऱ्या वर तूप आणि धुपकांडी पेटविल्याने पितरं प्रसन्न होतात. 
 
पितरांचे राग शांत आणि त्यांना समाधानी करण्याचे हे सोपे उपाय आहे-
* गायीला चारा खाऊ घालावा. 
* मूठभर काळे तीळ देणगी द्या.
* या व्यतिरिक्त आपण एक मूठभर काळे तीळ ब्राह्मणाला देणगी स्वरूपात दिल्यावर देखील आपले पितरं समाधानी होतात.