महादेवाचं अभिषेक केल्याने ते लगेच प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपल्या कृपेचा वर्षाव करतात. अभिषेक जल किंवा दुधाने केला जातो. श्रावण मासात महादेवाला अभिषेक केल्याने अभीष्ट फल प्राप्ती होते. विभिन्न प्रकाराच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात.
विशेष सामुग्रीने तयार शिवलिंग आणि त्यावर अभिषेक केल्याने मिळणारे शुभ फल
1. पाऱ्याचे शिवलिंग : पाऱ्याचे शिवलिंग सर्वोत्तम असतं. घर आणि दुकानात ठेवून पूजा केल्याने व्यवसायात विस्तार होतो आणि सौभाग्य व सुख-शांतीची प्राप्ती होती.
2. स्वर्ण निर्मित शिवलिंग : सुख-समृद्धीसह स्वर्गाची प्राप्ती होते.
3. मिश्री निर्मित शिवलिंग : आजार नाहीसे होतात.
4. मोती निर्मित शिवलिंग : स्त्रीच्या सौभाग्यात वृद्धी होते.
5. हिरा निर्मित शिवलिंग : दीर्घायू प्राप्त होते.
6. पुखराज शिवलिंग : धन-धान्य मिळतं.
7 . नीलम शिवलिंग : सन्मानाची प्राप्ती होते.
8. स्फटिक शिवलिंग : मनोकामना पूर्ण होते.
9. लहसुनिया शिवलिंग : शत्रूंवर विजय मिळते.
10. चांदी निर्मित शिवलिंग : धन-धान्याची प्राप्ती होते आणि पितरांना मुक्ती मिळते.
11. तांब्याचे शिवलिंग : दीर्घायुष्याची प्राप्ती होते.
12. पितळ्याचे शिवलिंग : समस्त सुखांची प्राप्ती होते.
13. कांस्य शिवलिंग : यश प्राप्त होतं.
14. लोखंडी शिवलिंग : शत्रूंचा नाश होतो.
15. बांबूचे शिवलिंग : वंश वृद्धी होते.
16. मिरची, पिंपळ चूर्ण, सुंठ आणि मिठाने तयार शिवलिंग : याची पूजा वशीकरण इतर कामासाठी केली जाते.
17. फुलांचे शिवलिंग : भूमी आणि भवन प्राप्ती होते.
18. फळांचे शिवलिंग : पूजा केल्याने उत्पादनात वृद्धी होते.
19. कणकेचे शिवलिंग : जवस, गहू आणि तांदळाच्या पीठ सम प्रमाणात घेऊन तयार केलेल्याला शिवलिंगाची पूजन केल्याने सुख-समृद्धी आणि संतान प्राप्ती यासह आजारापासून देखील मुक्ती मिळते.
20. उडीद डाळीचे शिवलिंग : सुंदर पत्नी प्राप्त होते.
21. लोण्याचे शिवलिंग : समस्त सुखांची प्राप्ती होते.
22. गुळाचे शिवलिंग : प्रेम आणि सौभाग्यात वृद्धी
23. धान्याचे शिवलिंग : शिवलिंगावर धान्य चिकटवून पूजा केल्याने उत्पन्न वाढून धन-धान्यात वृद्धी होते.
24. भस्म शिवलिंग : अभीष्ट सिद्धी प्राप्त होते.
25. दह्याने निर्मित शिवलिंग : दह्याला पिळून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्याने सुख-संपत्ती आणि धनाची प्राप्ती होते.
26. आवळ्याचे शिवलिंग : या शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्याने मोक्ष प्राप्ती होते.
27. कापूर शिवलिंग : आध्यात्मिक उन्नती होते.
28. दूर्वा शिवलिंग : अकाळ मृत्यूची भीती दूर होते.
29. पिंपळाच्या लाकडाने तयार शिवलिंग : दारिद्र्यापासून मुक्ती मिळते.
30. मातीचे शिवलिंग : विषारी जंतूंपासून रक्षा होते.