शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावणात महादेवाच्या पिंडीवर अर्पित करा हे पदार्थ, इच्छित मनोकामना पूर्ण होईल

श्रावणात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेकासाठी मंदिरात भक्तांची गर्दी असते. या दरम्यान शिवलिंगावर मनोभावे एक लोटा पाणी देखील अर्पित केले तरी महादेव प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात तरी आपल्या इच्छेप्रमाणे पदार्थ अर्पित केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. तर जाणून घ्या महादेवाची कृपा मिळवण्यासाठी पिंडीवर काय अर्पित करावे ते:
 
या प्रकारे करा अभिषेक
तसं तर महादेवाला जल अर्पित केलं जातं. शिवलिंगावर जल अर्पित करणे याला जलाभिषेक म्हणतात. परंतू काही विशेष प्राप्तीसाठी वेगवेगळे द्रव पदार्थ अर्पित करु शकता. जसे गंगाजल, ऊसाचा रस, दूध, मध इ.
 
आर्थिक संकटापासून मुक्तीसाठी
आर्थिक संकटापासून मुक्ती हवी असल्यास श्रावणात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर मध मिसळेलं पाणी अर्पित करावं. याने आय वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
 
दांपत्य जीवनातील समस्येपासून मुक्तीसाठी
वैवाहिक जीवानात कष्ट, कलह असे वातावरण असेल तर महादेवाला मध मिसळलेलं जल अर्पित करावं. नवरा-बायकोने सोबत हे काम केल्यास लवकर परिणाम प्राप्त होतील.
 
परीक्षेत यश मिळविण्यासाठी
विद्यार्थ्यांनी श्रावणात महादेवाचे पूजन दूध आणि खडीसाखरेने करावे. खडीसाखर मिसळून तयार दूधाने महादेवाचं अभिषेक करावं. याने बौद्धिक क्षमता आणि ज्ञान यात वृद्धी होईल. परीक्षेत चांगले परिणाम हातील येतील.
 
विवाहात अडचणी येत असल्यास
आपल्या विवाहात अडचणी येत असल्यास भक्तांनी प्रत्येक सोमवारी महादेवाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावे.
 
व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी
आपल्याला व्यवसायात काही अडथळे येत असतील तर महादेवाची आराधना करुन समस्या दूर होऊ शकते. श्रावणात दररोज महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक केल्याने समस्या दूर होईल. दररोज शक्य नसल्यास किमान सोमवारी अभिषेक करावे. फायदा होईल.