रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावण मास विशेष : महादेव पूजन करण्यापूर्वी जाणून घ्या या 11 खास गोष्टी

श्रावण महिना महादेवांचा पवित्र महिना मानला गेला आहे. या दिवसांत महादेवाची पूजा- अर्चना करण्याचे विशेष महत्त्व असतं. पूर्ण श्रावण महिन्यात सांगितल्याप्रमाणे पूजन केल्यास महादेवाची असीम कृपा प्राप्त होते. सोबतच जीवनातील सर्व कष्ट दूर होऊन जीवन आनंदात घालवता येतं.
 
तर जाणून घ्या महादेव पूजन बद्दल 11 विशेष गोष्टी, ज्या आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतात.
 
1. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून जावे आणि नित्य कर्मांहून निवृत्त होऊन स्नान करावे.
 
2. पूजा स्थळ स्वच्छ करून वेदी स्थापित करा.
 
3. महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर दूध अर्पित करावं.
 
4. नंतर पूर्ण श्रद्धेपूर्वक महादेवाच्या व्रताचं संकल्प घ्यावं.
 
5. दिवसातून दोनदा अर्थात सकाळी आणि संध्याकाळी महादेवाची प्रार्थना करावी.
 
6. पूजेसाठी तिळाचे तेलाचा दिवा लावावा आणि महादेवाला फुलं अर्पित करावे.
 
7. मंत्रोच्चार सह महादेवाला सुपारी, पंच अमृत, नारळ आणि बेलपत्र अर्पित करावे.
 
8. व्रत दरम्यान श्रावण व्रत कथा पाठ अवश्य करावं.
 
9. पूजा झाल्यावर प्रसाद वितरण करावं.
 
10. संध्याकाळी पूजा झाल्यावर व्रत सोडावं आणि सात्त्विक भोजन करावं.
 
11. मंत्र- श्रावण दरम्यान 'ॐ नमः शिवाय' मंत्र जप करत राहावा.