हरियाली / आषाढी अमावस्या सण भारताच्या अनेक भागात प्रामुख्याने साजरा करण्यात येतो. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष करून हा दिवस साजरा केला जातो तर जाणून घ्या काय नियम पाळावे त्या निमित्ताने आपल्या जीवनात देखील आनंद वाढेल आणि आरोग्य देखील सुधारेल.
* आम्हाला ऑक्सिजन प्रदान करणार्या पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू, शिव यांचा वास असतो. म्हणून वृक्ष लावण्यात मदत केल्याने त्यात विराजित देवता आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
* आपल्या पितरांच्या शांतीसाठी या दिवशी हवन केल्याचे देखील महत्त्व आहे.
* शास्त्रांनुसार या तिथीचे स्वामी पितृदेव आहे म्हणून पितरांच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मण भोजन आणि दान-दक्षिणा द्यावी.
* हरियाली अमावास्येला ब्रह्म मुहूर्तात उठून आपल्या ईष्ट देवाची आराधना करावी.
* आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी एखाद्या एकांत स्थळी असलेल्या नदीत किंवा जलाशयात स्नान करून योग्य ब्राह्मणाला दान द्यावं.
* आपल्या पितृगणांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करत वृक्ष लावायला हवे.
* भविष्य पुराणानुसार ज्यांना संतान नाही त्यांच्यासाठी वृक्षच संतान आहे म्हणून या दिवशी निष्काम भाव ठेवत वृक्षारोपण करावे.
* केवळ वृक्षारोपण केल्याने कर्त्वय पार पडले असे नाही, वृक्षाची देखभाल, पोषण देणे देखील आपलीच जबाबदारी समजावी.
* निसर्ग, पर्यावरण आणि वृक्षांप्रती आपली कृतज्ञता प्रकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला हरियाली अमावास्येला 1-1 झाडं तरी लावायलाच पाहिजे.
* स्नान आणि दान यासाठी अमावास्येचा खूप महत्त्व असून ही तिथी सौभाग्यशाली मानली गेली आहे. विशेष करून पितरांच्या आत्म्याची शांती हेतू हवन-पूजा, श्राद्ध-तरपण व इतर कर्म केल्याने ही तिथी श्रेष्ठ आहे.
* हरियाली अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घालाव्या.
* या दिवशी पिंपळ, वड, केळी, लिंबू, तुळस इतर झाड लावणे शुभ मानले गेले आहे.
* वृक्षारोपणासाठी अनुराधा, मूल, विशाखा, पुष्य, श्रवण, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, मृगशिर, रेवती, अश्विनी, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढ़ा, चित्रा इतर नक्षत्र शुभ फलदायी मानले जातात.
* हरियाली अमावास्येला नवीन झाड लावून त्यांची काळजी घेतल्याने अनंत पुण्य फळाची प्राप्ती होते.