रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

Gatari Amavasya 2019: गटारी अमावस्या म्हणजे काय

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात. 
 
श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.
 
पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.
 
हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात.
 
यंदा ही गटारी अमावस्या 31 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. 
 
आषाढी अमावस्या 31 जुलै रोजी 11. 57 मिनिटाला प्रारंभ होत असून 1 ऑगस्ट रोगी सकाळी 8.41 मिनिटांपर्यंत आहे. तसेच 1 ऑगस्ट रोजी गुरुपुष्यामृत योग सकाळी 6.18 मिनिटापासून ते दुपारी 12.11 मिनिटापर्यंत आहे.